सहा वर्षांनंतर जॉन कॅम्पबेलचा वेस्ट इंडिज संघात पुनरागमन!

13 Nov 2025 12:56:00
कोलकाता,
The return of John Campbell वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला असून, तब्बल सहा वर्षांनंतर सलामीवीर जॉन कॅम्पबेलची संघात पुनरागमन झाली आहे. या मालिकेला वेस्ट इंडिजसाठी मोठे महत्त्व आहे, कारण टी-२० मालिकेत ३-१ असा पराभव झाल्यानंतर संघावर पुनरागमनाचा दबाव आहे. पहिला एकदिवसीय सामना १६ नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
 
 
 
The return of John Campbell
 
कॅम्पबेलच्या पुनरागमनासह काही नवीन चेहरे संघात दिसणार आहेत. जोहान लायन आणि शमार स्प्रिंगर यांना प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. तर टी-२० संघाचा भाग असलेला आणि खांद्याच्या दुखापतीनंतर परतलेला वेगवान गोलंदाज मॅथ्यू फोर्ड यालाही संधी देण्यात आली आहे. या तिघांना अकील होसेन, गुडाकेश मोती आणि रॅमन सिमंड्स यांच्या जागी संधी मिळाली आहे.
 
 
वेस्ट इंडिज संघाने शेवटची एकदिवसीय मालिका बांगलादेशविरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ आणि जेडिया ब्लेड्स सहभागी होते, परंतु दुखापतीमुळे हे तिघे या मालिकेत खेळू शकणार नाहीत. दरम्यान, ब्रँडन किंगच्या खराब कामगिरीनंतर त्याच्या जागी कॅम्पबेलचा समावेश करण्यात आला आहे. जॉन कॅम्पबेलने गेल्या काही महिन्यांत कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्म दाखवला आहे. भारत दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते. त्याशिवाय, सुपर५० कपच्या मागील हंगामात कॅम्पबेलने सात डावांमध्ये २७८ धावा करत जमैकासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
 
वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघ
शाई होप (कर्णधार), अ‍ॅलिक अथानासे, अहकीम ऑगस्टे, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, जोहान लेन, खारी पियरे, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड आणि शमार स्प्रिंगर.
Powered By Sangraha 9.0