इंद्रधनुष्य स्पर्धेत विद्यापीठाचे घवघवीत यश

13 Nov 2025 20:51:50
अमरावती, 
rainbow-competition कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव इंद्रधनुष्य स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
 
 
rainbow-competition
 
प्रश्नमंजुषा कला प्रकारामध्ये आदित्य जोशी, व्योम देशपांडे व पूर्वा मानकर प्रथम, भारतीय समूहगान कला प्रकारात अनिष शिरभाते, अवंतिका काळे, आस्था जोंधळेकर, यशिका प्रांजळे, मनस्वी इंगोले, भाग्यश्री कलाने, श्रुतिका वैद्य, आनंदी गुल्हाने, श्रद्धा जाधव, रिद्धी ठाकरे प्रथम, चिकटकला कला प्रकारात मोहिनी विश्वकर्मा व्दितीय, वक्तृत्व कला प्रकारात पूर्वा मानकर तृतीय, रांगोळी कला प्रकारात प्रगती सुदा तृतीय, स्थळचित्र कला प्रकारात आदित्य वरणकर तृतीय, पाश्चिमात्य वाद्यसंगीत कला प्रकारात प्रथमेश अडाळगे तृतीय व स्वरवाद्य कला प्रकारामध्ये आकाश वानखडे याला तृतीय असे आठ पुरस्कार अमरावती विद्यापीठाच्या चमूंनी पटकाविले आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. rainbow-competition त्यातून अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अमरावती विद्यापीठाचा नावलौकिक करीत आहेत, असे उद्गार याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0