वर्धा,
congress-clash-in-mumbai वर्धा जिल्हा आजपासुन १५ वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला होता. आता तो इतिहास व्हायची वेळ आली आहे. काँग्रेससाठी सक्षम असलेल्या वर्धा जिल्ह्यात आज हा आमचा नेता असे कोणीही ठासून सांगू शकत नाही. नेताच असल्याने काँग्रेसमध्ये चिंधी बाजार झाला आहे. नगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबईत बैठक बोलवली. तेथे उमेदवार ठरवताना वर्धा जिल्ह्यातील विषयावर चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे वर्धेतील संभावीत उमेदवारांचे एबी फॉॅर्म देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

वर्धा जिल्ह्यात सत्ताधारी व विरोधी या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी संदर्भात अद्यापही एकमत झालेले नाही. तेली विरुद्ध कुणबी असा येथील राजकारणाचा प्रघात असल्याने दोन्हीही पक्ष अतिशय सावधतेने भूमिका घेत आहेत. काँग्रेसने कुणबी उमेदवार दिल्यास भाजपाने आजपर्यंत तेली उमेदवारावर प्रयोग केला आहे. दोन्ही पक्ष आलटून पालटून हाच प्रयोग करीत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. वर्धा जिल्ह्यात काँग्रेसची लोकसभा ते काँग्रेस अशी एकहाती सत्ता होती. परंतु, अंतर्गत कलहाने जिल्ह्यात काँग्रेसची पार वाट लावली. आज काँग्रेसच्या हाती तसे काहीही राहिलेले नाही. परिणामी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकत्र बसवण्याची ताकद असणारा दमदार नेताही आज काँग्रेसकडे राहिलेला नाही. congress-clash-in-mumbai नगर पालिकेकरिता जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका मुंबईत होत आहे वा झालेल्या आहेत. काँग्रेसची उमेदवारांसंदर्भात मुंबईत बैठक झाली. यात जिल्ह्यातील नगर सेवक व नगराध्यक्षांकरिता चर्चा होत असताना दादांचा वाद झाल्याची चर्चा वर्धेपर्यंत पोहोचली. यात नाना पटोले यांनीही मध्यस्थी करीत खडेबोल सुनावल्याची चर्चा आहे. या बैठकीत उमेदवारांवर एकमत झाले की नाही याविषयी स्पष्टता झाली नसली तरी जिल्ह्यात माजी मंत्री रणजित कांबळे असताना उमेदवारांना देण्यात येणारे एबी फॉर्म माजी मंत्री व काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रभारी राजेंद्र मुळक यांच्याकडे देण्यात आल्याने काँग्रेस श्रेष्ठींचा वर्धेतील नेत्यांवर विश्वास नाही काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.