आजचे युवक उद्याचं भविष्य-अप्पर जिल्हाधिकारी

13 Nov 2025 16:58:24
वाशीम,
Washim District Level Youth Festival देशाला विकसित राष्ट्र बनविण्याची जबाबदारी आजच्या युवकांच्या खांद्यावर आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती, आधुनिक शेती, डिजिटल इंडिया आणि भ्रष्टाचारमुक्त भारत या क्षेत्रात तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. भारतीय संस्कृती, नैतिकता आणि नवोन्मेष या त्रिसूत्रीवर आधारित कार्य केल्यासच देश विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत पोहोचेल, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले. तरुणाईच्या उत्साहाने आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला जिल्हास्तर युवा महोत्सव वाशीममध्ये वाटाणे लॉन येथे ११ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा झाला. यंदाचा युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक या थीमवर आधारित होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ओमप्रकाश झंवर, प्रा. सचिन खरात, प्रा. विजय भड, अनिल ढेंगे (जिल्हा युवा अधिकारी) आणि राजेश घुगे (संचालक, कृषी महाविद्यालय, आमखेडा) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.
 
 
Washim District Level Youth Festival
 
 
१० ते ११ नोव्हेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये कथालेखन, काव्यलेखन, चित्रकला , समूह लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, विज्ञान प्रदर्शनीचा समावेश आहे. समूह लोकनृत्यामध्ये आर. ए. कॉलेज, वाशीम, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशीम,जिजामाता विद्यामंदिर, अनसिंग यांनी सहभाग नोंदविला. लोकगीत कार्यक्रमात आर. ए. कॉलेज, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कानडे इंटरनॅशनल स्कूल, वाशीम यांच्या पथकाने सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत राधिका दीपक दंडे, शामल देवळे, आरुषी भुजाडे, कथालेखन प्रकृती चौधरी, स्वरा निलेश देशमुख, गार्गी गजानन जाधव, काव्यलेखन स्पर्धेत प्रणव दशरथ खडसे, राधिका दीपक दंडे, प्रकृती गजानन चौधरी, विज्ञान प्रदर्शनीमध्ये पी.एम.श्री. जि.प. शाळा, कामरगाव, आर. ए. कॉलेज, वाशीम, विद्यारंभ स्कूल, कारंजा (लाड), चित्रकला स्पर्धेत ईश्वरी सुनिल बेहरे (नारायणा किड्स, वाशीम), साक्षी धम्मानंद वानखडे (आर. ए. कॉलेज), विग्नेश अतिष वानखेडे यांनी सहभाग घेतला.
 
 
 
स्पर्धांचे परीक्षण किरण सोनुने, संदीप पट्टेबहादूर, अक्षय राऊत, प्रा. दीपक दामोदर, डॉ. शुभांगी दामले, प्रा. अनिल सोनुने, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा. मोहन सिरसाट, राजू पगार, प्रा. संजय दळवी, अमोल काळे, प्रा. शशी पवार, सुशिल भिमजियानी, अशोक मानकर, विजय भड, प्रा. प्रगती उके, ललित भुरे आणि प्रा. संदीप गोरे यांनी केले. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र, शिल्ड आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले असून, ते आता विभागीय स्तरावर वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0