आष्टी (श.),
young-man-drowned-and-died नदीवर पोहायला जातो म्हणून घरून निघून गेलेल्या युवकाचा जांब नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी घडली. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने गुरुवार १३ रोजी शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. दर्शन दिलीप मडावी (१९) असे मृतक युवकाचे नाव आहे.
तालुयातील बांबरडा येथील शेतकरी दिलीप मडावी यांना दोन मुले आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मडावी कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहे. लहान मुलगा हा शेतीची कामे करून कुटुंबाला हातभार लावतो. दरम्यान, बुधवारी लहान मुलगा दर्शनने जांब नदीवर पोहायला जातो म्हणून घरून निघून गेला. young-man-drowned-and-died मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. गुरुवारी जांब नदी शिवारात एक महिला शेळ्या चरईसाठी गेली असताना तिला नदीच्या काठावर मोबाईल, कपडे, व इतर साहित्य दिसून आले. घटनेची माहिती पोलिस पाटील मोहित बगळेकर यांना देण्यात आली. पोलिस पाटलांनी ही माहिती पोलिसांना देऊन दर्शनच्या आईवडिलांना सुद्धा दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.