नवी दिल्ली,
32 vehicles ready for attack दिल्लीतील लाल किल्ला स्फोटांच्या तपासात दहशतवाद्यांनी आखलेली भयंकर योजना उघड झाली आहे. आतापर्यंत फक्त चार गाड्या व्हाईट कॉलर दहशतवाद प्रकरणाशी जोडल्या गेल्या होत्या, मात्र आता समोर आले आहे की जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकूण ३२ गाड्या तयार केल्या होत्या. या गाड्या ६ डिसेंबर रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त हल्ल्यासाठी वापरण्याचा कट रचला होता.
संग्रहित फोटो
तपासात समोर आले आहे की या गाड्या स्फोटके आणि बॉम्ब वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत होत्या. सोमवारी लाल किल्ल्याजवळ घडलेल्या स्फोटात वापरलेली आय२० कार यामध्ये समाविष्ट होती. तसेच, मारुती सुझुकी ब्रेझा, मारुती स्विफ्ट डिझायर आणि फोर्ड इकोस्पोर्ट या गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हल्ल्यांसाठी निवडलेल्या ठिकाणांपैकी सहा ठिकाणे दिल्लीमध्ये होती. जप्त झालेल्या गाड्या जुनी आणि अनेक हातांमधून गेल्यामुळे पोलिसांसाठी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते.
विशेष म्हणजे, चौथी जप्त गाडी, मारुती सुझुकी ब्रेझा (HR87 U 9988), फरिदाबादमधील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमधून जप्त करण्यात आली, जी "दहशतवाद विद्यापीठ" म्हणून ओळखली जाते. बुधवारी संध्याकाळी फरिदाबादमधून एक फोर्ड इकोस्पोर्ट (DL10 CK 0458) देखील जप्त करण्यात आली होती. याआधी सोमवारी मारुती स्विफ्ट डिझायर जप्त करण्यात आली होती, ज्यामध्ये एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा सापडला होता. या प्रकरणामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, दहशतवाद्यांच्या पुढील योजना तपासण्याचे काम सुरू आहे.