तभा वृत्तसेवा
उमरखेड,
ajay-maheshwari-joins-bjp : शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख निर्णय आणि सामाजिक बांधिलकी यासाठी ओळखले जाणारे माहेश्वरी कुटुंबातील अजय माहेश्वरी यांनी शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
स्व. जेठमलजी माहेश्वरी यांनी गरीबांसाठी घरकुले, रोजगारनिर्मिती आणि वसंत सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सुरू केलेला विकासाचा वारसा अजय यांनी पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. वसंत कारखान्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्व. सुरेश माहेश्वरी हे अजय यांचे वडील होते.
या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार नामदेव ससाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, बाळासाहेब भट्टड, विवेक कन्नावार, महेश काळेश्वरकर, सविता पाचकोरे, अरविंद धबडगे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अजय माहेश्वरी यांच्या प्रवेशाने माहेश्वरी कुटुंबातील एक प्रभावी नेतृत्व भाजपा परिवारात दाखल झाले आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाला नवा आयाम मिळाल्याचे मानले जात आहे.