जिल्ह्यात दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

14 Nov 2025 18:04:08
वाशीम, 
Appointment of two election observers जिल्ह्यातील ४ नगरपरिषद व १ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन यांनी दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्त निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात भेटी देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाशीम, रिसोड नगरपरिषदेसाठी व मालेगाव नगरपंचायतीसाठी यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे निरीक्षक म्हणून कार्य करतील. कारंजा व मंगरूळनाथ नगरपरिषदेसाठी बुलडाण्याचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

Appointment of two election observers 
 
 
निवडणूक निरीक्षकांना मतदान केंद्रांची उपलब्धता व सोयी-सुविधा, कर्मचारी व प्रशिक्षणव्यवस्था, स्ट्राँग रूम व मतमोजणीची तयारी तसेच विभागांमधील समन्वय यांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा तसेच आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण, पेड न्यूज व सोशल मीडिया निरीक्षण याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक निरीक्षक खंडागळे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९६५७३५०६४४ तसेच चव्हाण यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०४९६०१० आहे. निवडणूक व्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास संपर्क साधता येईल. नामनिर्देशन छाननीपासून ते मतदान व मतमोजणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा आढावा घेऊन संबंधित अहवाल विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0