पंतच्या गुरुबुद्धीने बावुमा पहिल्याच चेंडूत बाद!

14 Nov 2025 13:21:21
नवी दिल्ली,
Bavuma dismissed in the first ball भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या चातुर्याने आणि स्टंपमागील आवाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. कोलकात्यात सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा मैदानात उतरला तेव्हा पंतने लगेचच त्याच्याविरुद्ध योजना आखली. क्षेत्ररचना सेट करताना तो जडेजाला म्हणाला, “जड्डू भाई, इथेच थांबा… हा स्वीप करतो,” अशी सूचना देत त्याने झेल घेण्यासाठी योग्य जागेचा संकेत दिला. जडेजाने काही म्हणताच पंतने लगेच उत्तर दिले, “नाही, एकाही धावासाठी नाही… तो पूर्ण स्वीपर आहे. मी झेल मागत होतो.
 
 
 
Bavuma dismissed in the first ball
पंतची रणनीती अगदी पुढच्याच चेंडूला फलीभूत ठरली. कुलदीप यादवने टाकलेल्या १६व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बावुमा पूर्णत: गोंधळला. मधल्या स्टंपवरून फिरणाऱ्या चेंडूचा अंदाज न आल्याने त्याच्या बॅटचा कडा लागला आणि जवळ उभ्या असलेल्या जुरेलच्या हातात सरळ कॅच जमा झाला. कर्णधार बावुमाला निराशेनं पॅव्हेलियनकडे परतावे लागले.
 
 
चार महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतसाठी हा क्षण खास ठरला आहे. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या गंभीर पायाच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले होते आणि अनेक महत्त्वाच्या मालिकाही त्याने मुकल्या होत्या. मात्र, कोलकात्यातील या कसोटीत पंतने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याची उपस्थिती केवळ फलंदाजीतच नव्हे तर स्टंपच्या मागेही सामन्याचा प्रवाह बदलू शकते.
Powered By Sangraha 9.0