वर्धा,
bihar-assembly-elections : बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयावर वर्धा जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया. वर्धा जिल्ह्यात भाजपाच्या वतीने विजयाचा जल्लोषही करण्यात आला. सायंकाळी वर्धेतील शिव सभागृहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
*जन कल्याणाचा विजय : पालकमंत्री डॉ. भोयर
विकासापासून वंचित असलेल्या बिहार राज्यात विकासाची गंगोत्री भाजपा जेडीयूच्या कार्यकाळात आली आहे. आमच्या सरकारने विविध जन कल्याणाच्या योजना राबविल्या त्यामुळेच जनतेने देखील भरभरून आशीर्वाद दिला. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढतो. त्यामुळेच जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. विरोधकांनी भाजपा व जेडीयुच्या विरोधात रान पेटविले होते. मात्र, जनतेने आरजेडी, काँग्रेस व मित्र पक्षांना चांगली चपराक दिली असल्याची प्रतिक्रिया वर्धा व भंडार्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली
*लालूला कंटाळून मतदान : तडस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मुद्यावर बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. तेथील मतदारांनी एकहाती सत्ता दिली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपाने जनतेमध्ये जाऊन मतं मागितल्याने जनतेनेही पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. याशिवाय माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून आणि विकास कामांवर विश्वास ठेवत जनतेने हा आशीर्वाद दिला असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार रामदास तडस यांनी दिली.
*विकासाला प्राधान्य : गाते
बिहारसह देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणारा विकास निवडला असल्याचे बिहारच्या निकालावरून अधोरेखीत झाले आहे. देशातील जनता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे कार्टून म्हणून बघतात. त्यांच्या भाषणात कुठेही सुत्रबद्धता वा देशाच्या विकासाचा विचार नसतो. सत्ताधार्यांवर चिखल उडवणे हा एकमेव त्यांचा धंदा आहे आणि जनता त्याला कंटाळली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास अजूनच दृढ होत असल्यानेच बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली.
*खोटेपणाला बिहारच्या जनतेने नाकारले : आ. कुणावार
समुद्रपूर : बिहार निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकास कामांच्या जोरावर जनतेच्या मनात असलेल्या विश्वास या निवडणुकीत विरोधकांना चारोहात चित करून एनडीएने विजय संपादन केला. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख विकासाचा खरा विजय असल्याचे मत व्यत करीत खोटेपणा, भ्रष्टाचार, दिशाभूल करणार्या राजकारण्यांना बिहारच्या जनतेने नाकारले, अशी प्रतिक्रिया आ. समीर कुणावार यांनी दिली.
*पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेवर विश्वास : आ. वानखेडे
देशात निवडणुका आल्या की आतापर्यंत इव्हीएम आणि आता एवढ्यात व्होट चोरीचा मुद्दा विरोधक लावून धरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपा यांचे प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले आहे. विरोधी पक्ष हरतो तेव्हा व्होट चोरी आणि इव्हीएमवर आरोप लावतो. त्या आरोपाला यानिमित्ताने उत्तर मिळाले आहे. मोदी यांची जनतेविषयी असलेल्या वचनबद्धतेवर बिहारच्या करोडो जनतेने विश्वास दाखवला असल्याची प्रतिक्रिया आर्वीचे आ. सुमित वानखेडे यांनी दिली.
*फेक नेरेटीव्ह बिहारींनी काढून टाकला : आ. बकाने
आजचा बिहारमधील विजय हा लोकशाही पद्धतीने झालेला विजय आहे. यानिमित्ताने व्होट चोरीचा फेक नेरेटीव्ह बिहारच्या मतदारांनी डोयातून काढून टाकला आहे. बिहारची जनता भारतीय जनता पार्टी, एनडीए सोबत असल्याचे या निकालांनी स्पष्ट केले आहे. तेथील जनतेला विकास हवा आहे. विकासाच्या बाजूने झालेला हा विजय असल्याची प्रतिक्रिया देवळीचे आ. राजेेश बकाने यांनी दिली.