भाजपाचा बिहार विजयाचा जल्लोष

14 Nov 2025 21:37:26
अमरावती, 
bjp-bihar-victory-celebration : भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आली आहे. या प्रचंड विजयाचा जल्लोष शुक्रवारी दुपारी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्यावतीने राजकमल चौकात करण्यात आला. ढोलताशाचा निनाद, आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. अनेक कार्यकर्ते बेधुंद नाचत होते.
 
 
amt
 
मतमोजणीला सकाळी सुरूवात होताच एनडीएच्या बाजुने कौल दिसासला लागला. मोजणी पुढे जात असताना एनडीएला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. भाजपाच्या नेतृत्वातला हा सलग मोठा विजय आहे. या प्रचंड विजयाचा अमरावती भाजपाच्यावतीने जल्लोष करण्यात आला. शहरातल्या राजकमल चौकात भाजपाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. ढोलताशाच्या तालावर कार्यकर्ते थिरकत होते. फटाक्यांची आतषबाजी होत होती. महिला कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्ते एकमेकाला पेढा भरवून आनंद व्यक्त करत होते. भाजपाचा जयघोष सलग सुरू असल्याने आसमंत दुमदुमला होता. भाजपाचा हा जल्लोष मार्गावरून जाणारा प्रत्येक नागरिक अनुभवत होता.
 
 
जल्लोषात भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, खा. अनिल बोंडे, आ. संजय कुटे, जयंत डेहनकर, प्रवीण पोटे, प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, महामंत्री बादल कुळकर्णी, ललीत समदुरकर, राधा कुरील, सुधा तिवारी, सुरेखा लुंगारे, गंगा खारकर, लता देशमुख, संगीता बुरंगे, पद्मजा कौंडण्य, भारती गुहे, शिल्पा पाचघरे, श्याम पाध्ये, विवेक चुटके, राजू मेटे, योगेश वानखडे, विक्की शर्मा, मंगेश खोंडे, शैलेंद्र मिश्रा, आशिष अतकरे, कैलास गिरूळकर, सतीश करेसीया, मिलिंद बांबल, राजू कुरील, संजय तिरथकर, रविकांत कोल्हे, तुषार चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.
Powered By Sangraha 9.0