चिखलदरा न. प. माजी अध्यक्ष भाजपात

14 Nov 2025 21:35:26
चुरणी, 
chikhaldara-bjp-congress : चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक जवळ आली असून त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. राजकीय हालचालींना सुद्धा वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसपासून तर विविध पक्षाचे पदाधिकारी चिखलदरा निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. अशातच शुक्रवारी चिखलदरा येथील माजी न. प. अध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्याहस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला.
 
 
amt
 
यावेळी खा. अनिल बोंडे, निवडणूक प्रमुख प्रवीण पोटे, जिल्हा निवडणूक प्रभारी संजय कुटे, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखडे, महामंत्री नितीन गुडधे उपस्थित होते. राजेंद्रसिंग सोमवंशी यांच्या प्रवेशामुळे चिखलदरा नगर परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक बळकट झाली आहे.
 
 
//काँग्रेस व भाजपात थेट लढत
 
 
राजेंद्र सिंह सोमवंशी यांच्या प्रवेशाने चिखलदरा नगरपालिकेत भाजपा व काँग्रेस यांची थेट लढत होण्याची शक्यता आहे. राजेंद्रसिंह सोमवंशी मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये होते. या निवडणुकीत ते भाजपवासी झाले असून त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते व उमेदवारांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश घेतलेला आहे. चिखलदराच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.
 
 
//चिखलदर्‍याच्या विकासाकरिता भाजपात
 
 
सध्या राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. चिखलदर्‍याचा विकास करायचा असेल तर भाजपा सोबत जाणे आवश्यक होते. विकासाच्या मुद्दावर भाजपात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0