समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला आयशरची धडक

14 Nov 2025 21:03:43
वर्धा, 
samruddhi-highway : समृद्धी महामार्गाने प्रवास करीत असताना आयशर चालकाला झोपेची डुलकी आल्याने सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. लखन काळुंखे (२२) रा. हडपसर पुणे असे मृतकाचे नाव आहे. तर इस्माईल इबाल सौदुवाले (२२) रा. गुलबर्गा कर्नाटक असे गंभीर जखमीचे नाव आहे. ही घटना शुक्रवार १४ रोजी पहाटे २.५५ वाजता समृद्धी महामार्गावर घडला.
 
 
jk
 
लखन काळुंखे आणि इस्माईल इबाल सौदुवाले हे एम. एच. १२ पी. यू. १२२० क्रमांकाच्या आयशरने नागपूरहून पुण्याला जात होते. येळाकेळी परिसरात चालक लखनला झोपेची डुलकी आली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर नियंत्रणाबाहेर जाऊन पेट्रोल पंपाकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात चालक लखन काळुंखे याचा जागीच मृत्यू तर इस्माईल इबाल सौदुवाले हा गंभीर जखमी झाला.
 
 
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक दिलीप थत्ते कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0