हिंगणघाट नगरपरिषदेत बोगस शिके-स्वाक्षरी रॅकेट

14 Nov 2025 21:11:44
हिंगणघाट, 
hinganghat-municipal-council : येथील नगरपरिषदेचे माजी प्रशासकीय अधिकारी विजय पाटील यांचा कार्यकाळ २३ सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त झाला. परंतु, २०२५ मध्ये त्यांच्या नावाने बोगस स्वाक्षर्‍या व मुख्याधिकारीपदाचा बनावट शिका वापरून ९० दिवसांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून देण्याचे मोठे रॅकेट हिंगणघाट शहरात सुरू होते. या रॅकेटमुळे मार्च २०२५ पर्यंत २२ हजारहून अधिक अनधिकृत व बोगस व्यतींची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झाली. त्यांनी लाखो रुपयांचा शासकीय लाभ उचलला आहे. यामुळे खर्‍या बांधकाम कामगारांच्या हकावर डल्ला मारला जात आहे.
 
 
jkl
 
या रॅकेटचा पर्दाफाश ९ एप्रिल रोजी उबाटाच्या वतीने करण्यात आला. शिवसैनिकांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना यासंदर्भात पुरावे सादर केले व कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही या गंभीर प्रकरणात कारवाई झालीच नाही. याप्रकरणी आता येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश लाजूरकर यांनी नागपूर येथे जाऊन कामगार आयुत यांच्याशी चर्चा करून कारवाईची मागणी केली. सरकारी जिल्हा कामगार अधिकार्‍यांना निवेदन सादर करून बोगस लाभार्थ्यांची कामगार कार्डे त्वरित बंद करण्यात बाबत व रॅकेटमध्ये सामील सर्व आरोपींची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनासोबत बोगस ९० दिवसांच्या प्रमाणपत्रांच्या प्रती व इतर पुरावे जोडण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0