महाविकास आघाडीच निवडणुकीत ‘ठरलं’ : आ.बाळासाहेब मांगुळकर

14 Nov 2025 20:02:18
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
balasaheb-mangulkar : होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा) गट एकत्र लढणार आहे. अशी घोषणा काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांनी शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
 
 
y14Nov-Mangulkar
 
यावेळी उबाठाचे जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे, संतोष ढवळे, शरद पवार गटाचे बाबासाहेब गाडे, काँग्रेसचे संतोष बोरले उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार बाळासाहेब मांगुळकर म्हणाले, नगर पालिका निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून समोर जाणार आहोत. कोणत्याही जागेसाठी आमच्यातील कोणताच पक्ष हट्ट करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून जो नगरसेवक विजय होईल. त्यांना संधी देण्यात येईल. तर महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या सहमतीने नप अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार आहे.
 
 
सध्या काँग्रेसकडे नप अध्यक्षपदासाठी सहा नावे आहेत. त्यापैकी चर्चा करून एक नाव निश्चित केल्या जाणार आहे. यवतमाळ नगर परिषद ही राज्यात पहिल्या क्रमांकावर होती. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही पुन्हा यवतमाळ नगर परिषद पहिल्या तीनमध्ये आणू. यवतमाळ स्वच्छ व सुंदर करुन, तसेच यवतमाळ नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास यावर आळा घालणार असल्याचे यावेळी सांगितले.
माधुरी मडावीचा निर्णय सोमवारी
 
 
काँग्रेसकडून माधुरी मडावी यासुद्धा नप अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, काही बाबींवर त्या न्यायालयात गेल्या आहेत. न्यायालयात सोमवारी निर्णय लागणार आहे. जर निर्णय माधुरी मडावी यांच्या बाजूने लागल्यास त्यांचाही अध्यक्षपदासाठी विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेतही एकत्रच
 
 
नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यातसुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूकीला समोर जाणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यावेळी देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0