हिंगणघाट,
kidnapping-minor-girl : येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यतीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्यावरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला. गुन्ह्याचा समांतर तपास केला असता गुप्त माहितीच्या आधारे पळवून नेणार्यास अटक करून अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व पिडीत मुलीची माहिती संकलीत करण्यात आली. तांत्रिक पद्धतीने तपास केला असता यश इरपाते (२५) रा. शेडेश्वर ता. उमरेड जि. नागपूर ह. मु. आलोडी हा वर्धेत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचुन यश इरपाते याला आलोडी येथुन ताब्यात घेआले. अल्पवयीन पीडीत मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहात असल्याचे सांगीतल्याने यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. यश इरपाते याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुभाष राऊत, दिवाकर परिमल, नितेश मेश्राम, संजय राठोड, शबाना शेख, नवनाथ मुंडे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.