जिल्ह्यात अध्यक्षासाठी २ तर सदस्यासाठी ११ नामांकन

14 Nov 2025 21:28:25
वर्धा, 
municipal-election-wardha : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आज १४ रोजी नामांकन दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी अध्यक्षपदासाठी २ तर सदस्य पदासाठी ११ नामांकनपत्र दाखल झाले.
 
 
j
 
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे या सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी आज शुक्रवार १४ रोजी वर्धा नगर परिषदेत सदस्यपदासाठी ३ नामांकनपत्र, हिंगणघाट नगर परिषदेत सदस्य पदासाठी ३, आर्वी नगर परिषदेत सदस्य पदासाठी ३, पुलगाव नगर परिषदेत सदस्य पदासाठी २ तर आर्वीत अध्यक्षपदासाठी २ असे १३ नामांकनपत्र दाखल झाले आहे, असे नगर पालिका प्रशासनाने कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0