तभा वृत्तसेवा
माहूर,
devotees-donate-crores-to-renuka-devi : श्री रेणुकादेवी संस्थानला नवरात्र ते दिवाळी कालावधीत भाविकांकडून 1 कोटी 48 लाखाची देणगी प्राप्त झाली. मंदिरातील चार दानपेटीतून 40 लाख 74 हजार रुपये, मंदिर परिसरातील दानपेटीतून 25 लाख 37 हजार, संस्थान कार्यालयात धनादेश क्रेडिट कार्डद्वारे 60 लाख 96 हजार, पातळ विक्रीतून 17 लाख 24 हजार, असे 1 कोटी 48 लाख 32 हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या शिवाय 187 ग्रॅम सोने व चार किलो चांदी प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापकांनी माहिती पत्रकाद्वारे दिली.

साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या रेणुकादेवीचे भक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात आहेत. नुकत्याच झालेल्या नवरात्र महोत्सवात आणि दिवाळीच्या सुट्ट्यात भाविकांची गडावर प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीचे प्रमाण थोडे कमी झाल्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी संस्थांनचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्रा दोथुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप, अशासकीय विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे यांच्या उपस्थितीत मंदिरातील व परिसरातील दानपेटी उघडून मोजमाप करण्यात आले.
परिसरातील या दानपेट्या सप्टेंबर 2024 पासून नुकत्याच 6 नोव्हेंबर रोजी उघडण्यात आल्या आहेत. एकंदरीत संस्थांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे दिसून येत आहे.