रामकृष्ण वाघ कॉलेजमध्ये नेहरू जयंती उत्साहात

14 Nov 2025 16:42:34
नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, त्यानंतर माता सरस्वती व नेहरू यांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
 
 
Ramakrishna Wagh College
 
बीसीसीए फर्स्ट इयरचा विद्यार्थी आदित्य रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. शाखा विभाग प्रमुख आणि प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी नेहरूंच्या जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही मूल्ये व शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ व संचालिका लता वाघ यांनी मार्गदर्शन केले. Ramakrishna Wagh College सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राष्ट्रगीताच्या गजरात संपन्न झाला.
सौजन्य: सायली लाखे पिदळी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0