पंतप्रधान मोदी एनडीएच्या प्रचंड विजयाचे सेलिब्रेशन करणार

14 Nov 2025 15:38:04
नवी दिल्ली,
PM Modi's victory celebration बिहारमध्ये एनडीएने प्रचंड विजय मिळवला असून पाटण्यापासून दिल्लीपर्यंत जल्लोष सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता भाजपा मुख्यालयात पोहोचतील आणि पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यावेळी पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांवर, प्रामुख्याने काँग्रेस आणि राजदवर जोरदार भाष्य करणार आहेत. मत चोरीच्या आरोपांवर राहुल गांधींवरही ते हल्लाबोल करू शकतात. यावेळी दिल्ली भाजपा मुख्यालयात लिट्टी-चोखा मेजवानी आयोजित करण्यात आली असून पक्ष कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत आहेत.
 
 modi
 
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एनडीए २०० जागांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. एनडीएमधील सर्व पक्षांनी आपापल्या जागा टिकवून ठेवली असून, जेडीयूने जोरदार पुनरागमन केले आहे. चिराग पासवान आणि मांझी यांनी आपले लोकसभा फॉर्म कायम ठेवले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावरून स्पष्ट होते की मोदी-नितीश जोडी सुपरहिट ठरली आहे. एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत, तर महाआघाडीला फक्त ३० जागांपर्यंतच मर्यादित यश मिळाले आहे. या विजयावरून एनडीए सरकारने राबवलेल्या महिला कल्याणकारी योजना प्रभावी ठरल्या आहेत, कारण महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे.
 
 
यावेळी तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मतचोरीचे मुद्दे काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करून मतदान अधिकार यात्रा आयोजित केली होती, तरीही यावेळी त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0