रवींद्र ओल्लालवार यांची घरवापसी

14 Nov 2025 16:48:14
गडचिरोली, 
Ravindra Ollalwar's homecoming भाजपमध्ये प्रवेश करून जवळपास दशकभर संघटनात्मक जबाबदार्‍या सांभाळणारे रवींद्र ओल्लालवार यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत पुन्हा एकदा धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला ‘घरवापसी’ म्हणून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा मिळत आहे.
 
 
 
Ravindra Ollalwar
 
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ओल्लालवार यांना भाजपमध्ये आपले राजकीय स्थान मजबूत होत नसल्याची खंत होती. कोणत्याही मतदारसंघात पक्षाकडून जागेची संधी उपलब्ध होणार नसल्याचे वास्तव लक्षात आल्याने त्यांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. आज, 14 ऑक्टोबर रोजी अहेरी येथे धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ओल्लालवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे अहेरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ताकद मिळाल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवरही या घडामोडीमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0