वर्धा,
transporting-marijuana : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गांजाची वाहतूक करणार्या दोघांना अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून गांजासह दुचाकी असा १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हिंगणघाट येथे १३ रोजी करण्यात आली.
पोलिस अधिकारी पद्माकर मुंडे, दीपक वानखडे, प्रशांत ठोंबरे व त्यांचे सहकारी हे हिंगणघाट परिसरात अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान, त्यांना गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शहालगंडी मंदिर रोड, हिंगणघाट येथे नाकेबंदी करून दुचाकीने येणार्या दोघांना थांबवून झडती घेतली. याच झडतीत गांजा आढळून आला. पोलिसांनी जय चुटे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट व प्रज्योत थूल रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट यांना अटक करून त्यांच्याकडून ४२४ ग्रॅम गांजा, गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एम. एच. ३१ डी. डब्ल्यू. ५०१७ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाइल असा १ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पद्माकर मुंडे, दीपक वानखडे, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, निलेश सूर्यवंशी, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली.