कवी मनाचा नेता पुन्हा रणभूमीत, कुठून लढणार?

15 Nov 2025 16:41:49
मुंबई,
Abhijeet Bichukale : सध्या राज्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली आहे. या वर्षी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. मतदान २ डिसेंबरला होणार असून, निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहिता लागू केली असून, उमेदवार आता अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, साताऱ्याचे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. अनेकांचे लक्ष लागले आहे की, अभिजीत बिचुकले साताऱ्यापासून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
 

BICHKULE 
 
 
 
नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असून त्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबर २०२५ ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. याआधी, अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्याच्या नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
अर्ज भरण्यानंतर बिचुकले यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी सांगितले, “साताऱ्यामध्ये मागील २५ वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची खराब स्थिती, बागांची दुर्बल स्थिती मला खूप काळापासून दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे जतन करणे तसेच साताऱ्याला एक सितारा बनवणे हे माझे उद्दिष्ट आहे. सातारकरांनी मला नगराध्यक्ष बनवावे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे. मी पूर्वी सौभ्यावती अलंकृता बिचुकले यांसाठी काम करत होतो, मात्र काही लोकांच्या स्वार्थासाठी मला नोकरीवरून हटवण्यात आले. आता नगरपालिका व्यवस्थेत सुधारणा करून सर्व भ्रष्ट आणि अपयोगी घटकांना बाहेर काढण्याचा माझा निर्धार आहे.”
 
अभिजीत बिचुकले यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीत त्यांचा उद्देश साताऱ्यातील प्रशासन आणि शहराची परिस्थिती सुधारण्यावर आहे, अशी चर्चा होत आहे.
 
निवडणुकीचा कार्यक्रम स्पष्ट झाला आहे. मतदान २ डिसेंबरला, निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, २१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर, २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
 
साताऱ्यात अभिजीत बिचुकले यांचा प्रवेश, त्यांच्या विरोधकांशी थेट संघर्ष, आणि नगरपरिषदेतील निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा भाग यामुळे नगरपरिषद निवडणुकीत राजकारणात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0