नागपूर,
Air hostess girl raped एअरहोस्टेस तरुणीला पबमध्ये नेऊन तिला दारु पाजण्यात आली. दारुच्या नशेत असताना तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच तरुणीचे अश्लीलोटो आणि व्हिडिओ काढून वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराला कंटाळलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. शुभम मोहन मेहनडोले (वय 31, रा. सावनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय तरुणी ही मूळ छत्तीसगडमधील रहिवासी असून ती नागपुरात हवाई सुंदरीचे (एअर होस्टेस) प्रशिक्षण घेण्यास आली. सध्या ती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्यासोबत सावनेर येथील एक तरुणीही प्रशिक्षण घेत आहे.
27 एप्रिलला मैत्रिणीने तिला पार्टीसाठी एअरपोर्टजवळ असलेल्या एका पबमध्ये नेले. त्यांच्यासोबत तरुणीचा मित्र, रितेश आणि शुभम हे दोघेही होते. चौघांनीही पबमध्ये पार्टी केली. यादरम्यान शुभमने पीडित तरुणीला दारू पाजल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे चौघेही घरी जाण्यासाठी कारमध्ये निघाले. दरम्यान शुभम तरुणीसोबत कारच्या मागच्या सीटवर बसला होता. तरुणी नशेत असल्याने त्याने तिचा गैरायदा घेणे सुरू केले आणि तिच्याशी त्याने अश्लील चाळे केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला धमकावणे सुरू केले. शुभमने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला. मात्र, तरुणाने नकार दिल्यावर तेोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर तरुणीने सोनेगाव पोलिस ठाणे गाठले. प्रकरण खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तिला खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले. तरुणीने खापरखेडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.