बाभुळगाव,
accidnet : तालुक्यातील वेणी-नायगाव रस्त्यावर गुरुवारी एका भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रशांत सुरेश घोडे (वय 45, कोंढा) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहनासह पसार झाला. बाभुळगाव पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत घोडे दुचाकी क्रमांक एमएच31 डीआर9326 ने वेणीकडून नायगावकडे येत होते. यावेळी निळ्या रंगाच्या विनानंबर ट्रॅक्टर व ट्रॉली क्र. एमएच29 एके5980 चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवत प्रशांतच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. पोेलिसांनी 281, 106 (1) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. फरार चालकाचा शोध पोलिस हवालदार नीलेश भुसे घेत आहेत.