तभा वृत्तसेवा राळेगाव,
Ralegaon police action हैद्राबादकडे कत्तलीसाठी गोवंशांची अवैध तस्करी करणाèया वाहनाचा वडकी पोलिसांनी सीनेस्टाईल पाठलाग करीत आयशर वाहनासह आरोपीला पकडले. देवधरी घाटात उभारलेल्या सापळ्याला चकवा देत पळ काढणाèया आयशर (क्रमांक एमपी20 जीए9564) वाहनाचा वर्धा नदीच्या पुलावर शिताफीने वेढा घालून ताबा घेतला. पोलिसांनी 33 गोवंशाची सुटका करून आयशर वाहनासह 26 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासणीदरम्यान वाहनातून 33 गोवंश आढळले. या गोवंशांची किंमत तब्बल 6 लाख 60 हजार रुपये तर आयशर वाहनाची किंमत 20 लाख रुपये आहे. वाहन चालवणारा आरोपी मो. नसीम मो. यासीन हन्सारी (रा. हमीद नगर, नागपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 325, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5, 5 (अ), 5 (ब) व प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. देवधरी घाटात पोलिस दिसताच चालकाने पळ काढला. उमरी, रुंजा, करंजीमार्गे नागपूरकडे पसार होत असताना वर्धा नदी पुलावर वाहतूक रोखून वाहनाला पकडण्यात यश आले.
ही कारवाई Ralegaon police action जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक भोरकडे, पोलिस उपनिरीक्षक कुडमेथे, मडकाम, पाली, डगवार व इतर कर्मचाèयांनी, तसेच पांढरकवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुशीर यांच्या सहकार्यान पार पाडली.