भीडीत पैशांच्या वादातून खुन

15 Nov 2025 19:30:35
देवळी, 
dewali-murder : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून भिडी येथे आदित्य शिरभाते (२६) युवकाचा खुन करण्यात आला. ही घटना शुक्रवार १४ रोजी रात्री ९.३० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.
 
 
 
jklj
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भिडी येथील भवानी मंदिर चौकातील आदित्यने राहुल गावंडे (३३) याच्याकडून पैसे उसने घेतले होते. या उसण्या पैशांवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवार १४ रोजी रात्री ९.३० वाजता पुन्हा दोघांत वाद झाला. दरम्यान, संतप्त राहुलने लाकडी दांड्याने आदित्यवर हल्ला केल्याने आदित्यचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राहुल गावंडे याला ताब्यात घेतले. पोलिस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले, ठाणेदार अमोल मंडळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Powered By Sangraha 9.0