श्याम पांडे
दारव्हा,
shiv-sena-bjp : दारव्हा नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चा जर असेल, तर ती शिवसेना-भाजपा युतीच्या घोषणा झाल्या. मग कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाची उमेदवारी निश्चित होईल. निवडणूक जवळ आली तरी देखील अद्याप युतीबाबत काही भागातील उमेदवारीसाठी एकमेकांची मनधरणी करताना दिसत आहे. युतीची अधिकृत घोषणा न झाल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांत प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. युती होणार की, स्वतंत्र लढत लढावी लागणार, हे मात्र युतीचा सूर आल्याशिवाय ठरणार नाही, असे दिसते.
शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत सभा सुरू आहे. पण निर्णय अद्याप होणे बाकी आहे. इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार, कोणत्या प्रभागात कोणाला संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट युती झाली तर ठरणार. अनेकांना द्विधा मन:स्थिती होताना दिसत आहे. निष्ठावान कायकर्ते संभ्रमात आहे. भाजपाला नप अध्यक्ष पदासह इतरही काही प्रभागांमध्ये मागणी होताना दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या वतीने युती न झाल्यास तयार रहा, असे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्साहासोबत संभ्रमही आहे. भावी उमेदवार छुपा प्रचार व आश्वासने देताना दिसतो. एकंदरीत राजकीय वातावरणात तापले आहे, चर्चांना मात्र उधाण आले.
या युती संदर्भात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे युतीकरीता ग्राह्य ठरणार आहे. पदाधिकारी युतीसाठी प्रयत्नशील दिसत आहेत. जर युतीसाठी यश न आल्यास स्थानिक पदाधिकारी स्वतंत्र निवडणूक लढवल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे बोलताना दिसत आहे. एवढे मात्र नक्की दोन्ही पक्षांच्या मतदारांना मात्र युती व्हावी असे दिसते.