व्यावसायिक समस्यांवर एनव्हीसीसीच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा

15 Nov 2025 20:28:20
नागपूर,
NVCC : जीएसटी २.० मधील बदलांमुळे येणार्‍या व्यावसायिक समस्या, प्रणालीचे सरलीकरण, चेक क्लिअरिंगची नवीन प्रणाली आणि विदर्भातील एमएसएमई आणि व्यवसाय वाढीशी संबंधित इतर समस्यांबद्दल नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारुख अकबानी यांच्या नेतृत्वात खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्यासोबत चर्चा झाली.
 
 
NVCCC-khandelwal
 
चेंबरच्या अधिकार्‍यांनी व्यावसायिक समस्यांवर प्रवीण खंडेलवाल यांच्यासोबत सकारात्मक केली. व्यापार्‍यांच्या हितासाठी आपण सदैव उपलब्ध असल्याची ग्वाही खंडेलवाल यांनी विदर्भातील १.३ दशलक्ष व्यापार्‍यांची अग्रगण्य आणि सर्वोच्च संस्था असलेल्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारुख अकबानी यांच्यासोबत माजी अध्यक्ष बी.सी. भारतीय, अश्विन अग्रवाल (मेहडिया), अश्विनी अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सचिव मनीष जेजानी आणि हुसेन नुरल्लाह अजानी यांनी पुष्पगुच्छ, हार आणि स्कार्फ देऊन खंडेलवाल यांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0