मानोरा,
chandrakant thackeray ग्रामीण भागामध्ये आवडीने खेळल्या जात असलेल्या कबड्डीसह इतरही देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनेक दर्जेदार खेळाडू आहे. मात्र, त्यांना व्यासपीठ नसल्याने त्यांच्यातील खेळ गुण लुप्त पावत आहेत, असे प्रतिपादन जि. प. माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
सेवालाल महाराज क्रीडा मंडळ तथा हौसी क्रीडा पटूद्वारा आयोजित एक दिवसीय खुल्या कबड्डी सामन्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते कारखेडा येथे सायंकाळी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी आधी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्घाटकांच्या हस्ते करण्यात येऊन क्रीडांगण पूजन तथा सहभागी झालेल्या संघाची ओळख सुद्धा पाहुण्यांना करून देण्यात आली. मंगरुळनाथ पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर पाटील, कारखेडाचे माजी सरपंच भानुदास जाधव, राजू गुल्हाने, यशवंत इंगळे, श्याम देशमुख, प्रदीप देशमुख, शाम डोळस, विजय राठोड आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिकासह पंचक्रोशीतील हौशी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते.chandrakant thackeray ग्रामीण भागांमध्ये रांगडे खेळाडू तयार होण्यासाठी कबड्डी हा देशी क्रीडा प्रकार अत्यंत महत्त्वाचा असून, क्रिकेट या क्रीडा प्रकाराने जरी भारत व आशिया खंडातील नागरिकांना वेड लावले असले तरीही कबड्डी हा क्रीडा प्रकार ग्रामीण भागातील युवकांचे भविष्य घडविण्याकरिता मोलाचे हातभार लावण्यासाठी सुद्धा उपयोगी पडत असल्याचे प्रतिपादन ठाकरे यांनी केले. कबड्डीसह इतर देशी क्रीडा प्रकारांना क्रीडांगणे उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर पाठपुरावा करणार असल्याचे मत यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केले.