नवी दिल्ली,
IND vs SA Day 2 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चमक दिसून आली, त्याने फक्त २७ धावांत ५ बळी घेतले. यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांत गुंडाळले. भारत त्यांच्या पहिल्या डावात १८९ धावांवर ऑलआउट झाला आणि ३० धावांची आघाडी घेतली. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ३९ धावा केल्या.