वणी,
Madhav Sarpatwar passes away सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गंगाधर सरपटवार (84) यांचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार होतील. अंतिम यात्रा यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसर येथून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा शैलेश, मुलगी शिल्पा, सून, जावई, नातवंड, भावंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
श्री जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ अशा विविध सामाजिक, साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रांत ते अग्रेसर होते. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन आणि लेखन केले होते. मितभाषी सुस्वाभावी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.