नागपूर,
mobile-uts-railway-ticket : मोबाइल यूटीएस सहायक’ या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून मध्य रेल्वेने आता चालता, फिरताना रेल्वे तिकीट सेवेची सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना झटपट तिकीट काढता येत आहे. रेल्वेस्थानकावर यूटीएस प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता प्रवाशांना मोबाइल यूटीएस सहायकांची मदत होत आहे. एम-यूटीएस सहायक रेल्वे स्थानकाच्या परिसरात रांगेत असलेल्या प्रवाशांकडे जाऊन, प्रवासभाडे स्वीकारून तिकीट तत्काळ देणार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे मोबाइल फोन आणि एक लहान तिकीट प्रिंटिंग मशीनदेखील राहणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर अशी सुविधा लवकरच मिळणार आहे.
अनेक प्रवाशी गर्दीत उभे राहण्यास असमर्थ असतात आणि अनेकांना यूटीएसचा वापर करणे जमत नाही. प्रवाशांना समोर ठेवून ही सुविधा सुरू करण्यात आली असून भारतीय रेल्वेने ही सीएसएमटी मुंबईसह दिल्ली, कोलकता, चेन्नई स्थानकावरही सुरू केली आहे. यानंतर ही सुविधा नागपूर रेल्वे स्थानकावर मिळणार आहे.