तेथे धुरामध्ये अनेक मृतदेह आणि मुंडके पडलेले होते!

15 Nov 2025 09:45:29
श्रीनगर,
Nowgam Police Station दिल्लीमधील स्फोटाचा तपास अजून सुरू असतानाच, जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलिस स्टेशनला शुक्रवारी रात्री उशिरा एका प्रचंड स्फोटाने हादरवून टाकले. स्फोटाचा आवाज सुमारे ५ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या भीषण घटनेत आतापर्यंत नऊ जण ठार झाले असून २९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतेक पोलिस आणि फॉरेन्सिक अधिकारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी तारिक अहमद यांनी स्फोटानंतरच्या दृश्याचे वर्णन करत सांगितले, आम्हाला मोठा स्फोट ऐकू आला. सुरुवातीला समजायला वेळ लागला की काय घडले आहे. जेव्हा लोक बाहेर आले तेव्हा तो भाग कयामतसारखा दिसत होता. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते; खूप धूर होता, मृतदेह आणि डोके पडलेले दिसत होते. आमचे लोक आणि शेजारी या घटनेत मरण पावले आहेत आणि हे खूप मोठे नुकसान आहे.
 
 
Nowgam Police Station
 
अधिकार्‍यांनी सांगितले की, जखमींना श्रीनगरमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोट हा हरियाणाच्या फरीदाबाद येथून आणलेल्या स्फोटक पदार्थांच्या तपासणीदरम्यान झाला. अटक केलेल्या डॉक्टर मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या ३६० किलो स्फोटकांचा हा भाग होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्फोटानंतर परिसराला ताबडतोब वेढा घालण्यात आला असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट 'व्हाइट कॉलर' दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित असल्याचे देखील समजते आणि तपास चालू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0