वडिलांना बघताच गळ्यात बिलगले चिमुकले

15 Nov 2025 14:27:25
अनिल कांबळे
नागपूर,
Prison girls hug each other वडिल किंवा आजाेबा काेणत्यातरी गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भाेगतायेत. त्यांना भेटायची अतिव इच्छा आहे, पण मनात भीती आणि संकाेचसुद्धा आहे. आपापल्या आई-किंवा वडिलांच्या विरहात अनेक मुले-मुली मन मारुन नातेवाईकांसह जीवन जगत हाेते. मात्र, कारागृह प्रशासनाने बालदिनाचे निमित्त साधून अशा मुलांच्या चेहèयावर आनंद पेरण्याचा अनाेखा उपक्रम राबविला. त्यांच्या आई-वडिल-आजाेबांची थेट गळाभेट घालून देऊन बालदिनाचे त्यांना आगळेवेगळे ‘गिफफ्ट’ दिले. आज चिरेबंदी तटांनी बंदिस्त असलेली कारागृहाची वास्तूलासुद्धा बाप-मुलांच्या भेटीने पाझर ुटला असावा, अशी स्थिती कारागृहात निर्माण झाली हाेती.
 
Prison girls hug each other
नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारातून शुक्रवारी आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या सुमारे तीनशे मुलांची प्रत्यक्षात गळाभेट घडवून आणली. कळत-न कळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भाेगत आहेत. शिक्षा भाेगत असलेल्या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची संधी सहजासहजी उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने या गळाभेट कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. या माध्यमातून बंदिवान आणि त्यांच्या मुलांचं नातं आणखी घट्ट हाेणार असा विश्वास नागपूर कारागृह प्रशासनाला आहे. कार्यक्रमाला राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) नागपूर वैभव आगे, कारागृह उपअधीक्षक दीपा आगे उपस्थित हाेत्या.
चिरेबंदी भींतीही गहिरवल्या
कारागृहातील बंदीवानांना आपल्या मुलांना भेटावे, त्यांना गाेंजारावे आणि त्यांना घट्ट मिठी मारता यावी, अशी मनाेमन इच्छा असते. मात्र,प्रत्यक्षात असे हाेऊ शकत नाही. मात्र, कारागृहाचे प्रमुख सुहास वारके यांच्या सकारात्मक प्रयत्नाने ते शक्य झाले. नागपूर कारागृहात 300 बंदिवांना आपापल्या आप्तेष्ठांसह मुला-मुलींना गळाभेट उपक्रमाअंतर्गत भेटता आले. त्यांचे लाड आणि काैतूक करता आले. ज्यावेळी ही हृदयस्पर्शी गळाभेट हाेत हाेती. त्यावेळी फक्त बंदिवान किंवा त्यांचे पाल्य नाही तर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचाèयांचे डाेळे पाणावले हाेते.
मुलांचा निराेप अन् धाडधिप्पाड बापाचा ‘हंबरडा’
कारागृहातील वातावरण आणि संगती यामुळे मनाने खचलेल्या बंदीवानांना मुलांच्या भेटीची ओढ असते. मुलांची तासभर गळाभेट झाली. मुले अंगाखांद्यावर खेळली. त्यांना खाऊ दिला आणि छातीशी घट्ट पकडून मिठी मारली. आता वेळ झाली हाेती मुलांचा निराेप घेण्याची. मुले वडिलांना साेडून बाहेर जायला लागले आणि त्यांना निराेप देताना धाडधिप्पाड बाप मात्र ‘हंबरडा’ ाेडून रडत हाेता. यामुळे कारागृहातील वातावरण धीरगंभीर झाले हाेते.
Powered By Sangraha 9.0