मानोरा,
aadhaar card holders शहर व तालुयातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी केवळ एक आधार नोंदणी असल्यामुळे या केंद्रधारकाद्वारा बेकायदेशीर भरमसाठ शुल्क आकारणी करून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची लूट केल्या जात असून, याबाबत शहर भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने आमदार सई प्रकाश डहाके यांना लेखी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शहर व तालुयातील नागरिकांची आधार नोंदणी व आधार सुधारणा करण्यासाठी गरजेचे असलेले अधिकृत एकच आधार केंद्र असल्यामुळे शहर व तालुयातील नागरिकांना नोंदणी असो वा आधार कार्ड मधील कुठलीही किरकोळ सुधारणा, मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. केंद्र केवळ एक असल्याने केंद्र धारकाकडून शहर व तालुयातील गरजू नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांच्या वतीने आमदारांकडे करण्यात आली आहे.aadhaar card holders लाडकी बहीण योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना व अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्यांच्या नुकसान भरपाईसाठी केवायसी करणे गरजेचे असल्याने एकच आधार केंद्रात भल्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांसह महिला आणि विशेषतः गरोदर महिला भगिनींना सुद्धा बोचर्या थंडीत तासंतास उभे राहण्याची पाळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नागरिकांची आर्थिक लूट करणार्या केंद्रधारकांवर कारवाई करण्यात यावी आणि नागरिकांचे आवश्यक शुल्क सूचना व मार्गदर्शक तक्ता लावण्या संदर्भात संबंधितांना सुचित करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपा पदाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या समवेत मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद इंगोले, पोहरादेवी मंडळ अध्यक्ष गणेश जाधव, महिला तालुका अध्यक्ष सीमा राठोड, मनोज खडसे आदी पदाधिकार्यांच्या वतीने आमदारांना देण्यात आले.