वडनेर-मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेलवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा छापा

15 Nov 2025 21:53:48
बुलढाणा, 
kiran-patil : जिल्हा प्रशासनाकडून दि.१५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात अवैध बायोडिझेल व्यवहारावर मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या वडनेर—मलकापूर रोडवर संशयितरित्या उभा असलेल्या टँकरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२ लाख ३३ हजार १९४ रुपये किमतीचे २९ हजार ३० किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून संबंधित ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
 

jkl 
 
उपलब्ध माहितीनुसार, वडनेर—मलकापूर रोडवर उभा असलेला टँकर क्रमांक जी. जे. ०३ बी. डब्ल्यू ३०३४ संशयितरित्या आढळून आला होता. या टँकरचा चालक सहदेवने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यावर संशय बळावल्याने टँकरवर छापा टाकण्यात आला. हे बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली, अंकलेश्वर, जिल्हा भरूच (गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथे पाठविण्यात येत होते. गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 
 
या प्रकरणात संबंधितांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार राहुल तायडे, पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांनी केली असून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. अवैध बायोडिझेल विक्री, वाहतूक व साठा प्रकरणी पुढील तपास जिल्हा प्रशासन व पोलिस निरीक्षक गणेश गिरी करत आहेत.जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल व्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. यात गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अवैध बायोडिझेल आढळल्यास त्याबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0