आर्वीत एका नगराध्यक्षाकरिता २४ अर्ज

15 Nov 2025 19:24:33
आर्वी, 
arvi-mayor : मागील निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या १०० टके म्हणजे २३ जागा जिंकणार्‍या भाजपाकडे नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारीसाठी रांग लागली आहे. जिल्ह्यात आर्वी नगर पालिकेत खुल्या प्रवर्गातील महिलेकरिता नगराध्यक्षद राखीव असताना ओबीसी प्रवर्गातील महिल्यांच्याच नावांची चर्चा सुरू आहे. आ. सुमित वानखेडे यांच्या आर्वी एन्ट्रीनंतर शहराचा झालेला विकास लक्षात घेता आर्वीत भाजपासाठीचे वातावरण अनुकुल असल्याने नगराध्यपदाकरिता उमेदवारी मागणार्‍यांची संख्या सपाट्याने वाढली आहे.
 

hjh 
 
भाजपाने नगराध्यक्षपदांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आर्वी नगराध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या २४ महिलांनी पक्षाकडे अर्ज दाखल करून मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. यात आ. दादाराव केचे यांच्या स्नुषा योगिता केचे, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या पत्नी शुभदा, डॉ. कालिंदी राणे, स्नेहल शिंगाणे, शुभांगी गाठे, दीपा मोटवाणी, स्मिता थोरात, दुर्गेशनंदिनी पुरोहित, वर्षा ठाकूर, शुभांगी सुजित भिवगडे, जया चौबे, स्नेहा जाजू, साधना अजमिरे, सुषमा हिवाळे, राधिका विष्णूप्रसाद भारती, माधुरी निस्ताने, मंजू गोडबोले (गुल्हाने) आदी इच्छुक महिलांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0