संत्रा बागाईतदारांना मागील वर्षीच्या विमा परताव्याची रक्कम अदा करा

15 Nov 2025 19:22:40
वर्धा, 
Amar Kale : मागील वर्षी संत्रा बागाईतदारांनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून संत्रा बागांचा विमा काढला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील संत्र्याचा आंबीया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण होऊन नुकसानीपोटी इन्शुरन्स कंपनीकडून परताव्याबाबत मंजुरी सुद्धा झाली होती. परंतु, संत्रा बागाईतदारांना मागील वर्षीच्या विम्याची रक्कम अद्यापही मिळाली नाही. यावर्षी पुन्हा दुसर्‍या वर्षाचा विम्याच्या रकमेची परतफेड देण्याची वेळ आली. परंतु, रिलायन्स कंपनीने मागील वर्षीच्याच विम्याची राशी अजूनही शेतकर्‍यांना दिली नाही. ती रकम शेतकर्‍यांना तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी खा. अमर काळे यांनी कृषिमंत्र्यांना केली आहे.
 
 
kale
 
शेतकर्‍यांनी वारंवार शासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला परंतु, प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखरे, नुकसानग्रस्त व भरपाई मिळण्यास पात्र असलेल्या शेतकर्‍यांनी खा. काळे यांचेकडे आपली व्यथा व्यत केली व नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत विनंती केली. खा. काळे यांनी संत्रा बागाईतदारांची व्यथा समजावून घेतली व मागील वर्षीच्या पीक विम्याच्या रकमेची परतफेड तात्काळ अदा करणेबाबत कृषिमंत्री दत्ता भरणे यांना निवेदन देऊन विनंती केली.
Powered By Sangraha 9.0