राजकीय उलथापालथ! शिंदे गट भाजपात जाणार?

15 Nov 2025 16:35:21
मुंबई,
Shinde group join BJP : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राजकारणात गदारोळ वाढला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून, अद्याप महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र, काही विश्लेषकांच्या मते नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका देखील त्वरित लागू होऊ शकतात. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना गती मिळाली असून, अनेक ठिकाणी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा वेगही वाढत चालला आहे. अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.
 
 
BJP
 
 
 
याच पार्श्वभूमीवर नाशिकमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मालेगावमध्ये मोठ्या राजकीय भूचालाची शक्यता असून, बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक आणि मालेगाव विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले नेते बंडूकाका बच्छाव लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बंडूकाका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांच्या प्रवेशाची गप्पा जोर धरू लागल्या आहेत.
 
 
जर बंडूकाका भाजपात प्रवेश करतात, तर शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरेल. कारण बंडूकाका हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भूसे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली नाही, तर बंडूकाका बच्छाव यांच्या रुपात शिवसेना शिंदे गटापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यांनी गेल्या मालेगाव विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मत मिळवण्यात दुसऱ्या क्रमांकावर येत महत्वाचा ठसा उमठवला होता.
 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंडूकाका यांनी देखील आपल्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात युती न झाल्यास शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच, डॉ. तुषार शेवाळे आणि प्रसाद हिरेनंतर बंडूकाका बच्छाव यांच्या प्रवेशामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढेल, असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या प्रवेशामुळे मालेगावचे राजकीय समीकरण आगामी निवडणुकीत खूपच बदलण्याची शक्यता आहे, ज्यावर शिवसेना शिंदे गटाला मोठी लक्ष ठेवावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0