नवी दिल्ली,
car-bomb-blast-in-delhi दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर उघड झालेल्या ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल’च्या तपासात प्रत्येक दिवशी नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर नबी गेल्या वर्षापासून एक आत्मघाती दहशतवादी शोधत होता. अटक करण्यात आलेल्या एका सहआरोपीने चौकशीत सांगितले की, उमरने त्याला फिदायीन बनवण्याचा दबाव टाकला होता, पण त्याने इस्लाममध्ये आत्महत्या हराम असल्याचे सांगत ते मान्य करण्यास नकार दिला.

या सहआरोपीच्या चौकशीतून स्पष्ट झाले की डॉ. उमर अत्यंत कट्टरपंथी बनला होता आणि आपल्या दहशतवादी मोहिमेसाठी त्याला एक आत्मघाती हल्लेखोर हवा होता. 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार चालवताना उमर ठार झाला होता. त्यानंतर तपासाने वेग घेतला आणि अनेक नवीन नावे समोर आली. पीटीआयच्या माहितीनुसार, श्रीनगर पोलिसांनी दक्षिण काश्मीरातील काजीगुंड येथे जाऊन डॉ. अदील राचर आणि डॉ. मुजफ्फर गनई यांच्यासह इतर सहआरोपींची सखोल चौकशी केली. car-bomb-blast-in-delhi त्यावरून राजकीय शास्त्राचा विद्यार्थी जसीर उर्फ ‘दानिश’ याला ताब्यात घेण्यात आले. जसीरने कबुल केले की तो गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कुलगामच्या एका मशिदीत ‘डॉक्टर मॉड्यूल’शी प्रथम भेटला आणि त्यानंतर त्याला फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाजवळील भाड्याच्या घरात नेण्यात आले.
तपासात जसीरने हेही सांगितले की मॉड्यूलमधील सदस्य त्याला जैश-ए-मोहम्मदसाठी ओव्हरग्राउंड वर्कर बनवू इच्छित होते. डॉ. उमरने त्याचे अनेक महिन्यांपर्यंत ब्रेनवॉश केले आणि आत्मघाती हल्ला करण्यास प्रवृत्त केले. मात्र एप्रिलमध्ये त्यांच्या योजनेला धक्का बसला. car-bomb-blast-in-delhi जसीरने आपल्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि इस्लाममध्ये आत्महत्या पाप मानली जाते, या कारणाचा आधार घेत आत्मघाती दहशतवादी बनण्यास ठाम नकार दिला. या नकारानंतर डॉक्टर मॉड्यूलचा संपूर्ण प्लॅन कोसळू लागला आणि त्यानंतरच उमर व त्याच्या कारवायांवर तपास संस्थांचा पूर्ण फोकस केंद्रित झाला.