मुंबई,
Bhoot Police 2 दक्षिण आणि बॉलिवूडमध्ये आपल्या विनोदी आणि अचूक दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्याची तयारी करत आहेत. हंगामा, हेरा फेरी, भूल भुलैया आणि मालामाल वीकली सारख्या कल्ट कॉमेडी देणाऱ्या या दिग्दर्शकाची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या चित्रपटांवरील संवाद, प्रसंग आणि विनोदी टायमिंग आजही सोशल मीडियावर रील्सच्या रूपात व्हायरल होताना दिसतात.
आता प्रियदर्शन Bhoot Police 2 एका नवीन हॉरर–कॉमेडीपटावर काम करत असून ‘भूत पुलिस 2’ या सिक्वेलने आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. पहिल्या भागात सैफ अली खान आणि अर्जुन कपूर ही जोडी मोठ्या उत्साहात पाहायला मिळाली होती; मात्र या वेळी स्टारकास्टमध्ये पूर्ण बदल होणार आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही बातमी निराशाजनक असली तरी निर्मात्यांनी कथेनुसार नवा ताजेपणा आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.स्रोतांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचे काम गुपचूप सुरू आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रियदर्शनच सांभाळत असून सध्या पटकथा अंतिम करण्याची प्रक्रिया चालू आहे. पहिल्या भागाचे निर्माते रमेश तुर्रानी नव्यानेही निर्मिती करणार आहेत. कथा पूर्णपणे बदलण्याबरोबरच कास्टिंगही नव्याने ठरवली जात आहे. या वेळी अॅडव्हान्स्ड सुपरनॅचरल एलिमेंट्सचा वापर करून हा प्रकल्प अधिक भव्य करण्याचा प्रयत्न आहे.
भूत पुलिसचा पहिला भाग कोरोना काळात थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. जिओ प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला होता. सैफ आणि अर्जुनसोबत जैकलीन फर्नांडिस, यामी गौतम, जेमी लीव्हर आणि राजपाल यादव यांनी त्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.नव्या स्टारकास्टसह नव्या कथानकावर आधारित ‘भूत पुलिस 2’ कडे प्रेक्षकांमध्ये आधीच अपेक्षांची उंची वाढली आहे. प्रियदर्शन पुन्हा एकदा हॉरर–कॉमेडी या लोकप्रिय फॉर्म्युलाला नव्या जोमानं सादर करत असल्यानं बॉलिवूडमध्ये या चित्रपटाची मोठी चर्चा रंगू लागली आहे.