तभा वृत्तसेवा दारव्हा,
Darwha Municipal Council election राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी 4 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.ही निवडणुक घेण्याकरता प्रशासन सज्ज झाले असून निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार रवी काळे, सहाय्यक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. या निवडणुकी करीता नप अध्यक्षपादासह अकरा प्रभाग असुन 22 वार्ड आहेत. पुरुष मतदारांची संख्या 14 हजार 999 असुन महिला मतदार 14 हजार 898 तर एक तृतीयपंथी आहे.
या निवडणूक प्रक्रियेकरीता 35 केंद्र व 45 केंद्राध्यक्ष असून अधिकारी व 150 कर्मचारी नियूक्त करण्यात आले आहे, अशी माहिती पुरवठा निरीक्षक तुषार राठोड यांनी दिली. या निवडणुकी करता ग्राम महसुल अधिकारी नरेंद्र कोत्तावार, सहायक स्वप्निल पानोडे, महेश साखरकर व सर्व महसूल व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी निवडणूक यशस्वी पार पडावी या करता परिश्रम घेत आहे.