देवळीत भाजपाचे नप अध्यक्षांसह सदस्यांचे नामांकन दाखल

16 Nov 2025 20:25:12
देवळी, 
deoli-bjp : देवळी नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदाकरिता माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांच्यासह २० नगरसेवकपदांच्या उमेदवारांचे अर्ज आज रविवार १६ रोजी विजय संकल्प यात्रा काढून शती प्रदर्शन करीत जल्लोषात दाखल केले. या संकल्प यात्रेचे नेतृत्व आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांनी केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती होती.
 
 
 
bjp
 
 
 
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर आ. राजेश बकाने म्हणाले की, देवळीचा विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या जिवनमानात मुलभूत सुधारणा हा आमचा विजय संकल्प असल्याचे सांगितले. भाजपाने नेहमीच विकास, सुशासन आणि उत्तरदायित्व यांची राजकारणात नवी परिभाषा निर्माण केली आहे. देवळीच्या प्रत्येक प्रभागात विकासाची नवी दिशा देण्यासाठी सक्षम, जबाबदार आणि प्रामाणिक उमेदवारांना पक्षाने उभे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील मागील काळातील विकास कामांचा उल्लेख करत पुढील पाच वर्षांसाठीचे उद्देष्ट मांडले. नवीन रस्ते, पाणीपुरवठा सुधारणा व गतीरोधक यंत्रणा, सांडपाणी व्यवस्थापनाचा संपूर्ण आराखडा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, डिजिटल व स्मार्ट सुविधा असलेले नागरिक केंद्र, महिला व युवकांसाठी सुरक्षा व रोजगाराभिमुख योजनांचा लेखाजोखाही त्यांनी यावेळी मांडला. देवळीचे संपूर्ण रूपांतर करण्याचा संकल्प केला असून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी देवळीतील प्रत्येक घराचे आशीर्वाद आमची ताकद ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
 
 
ही विजय संकल्प यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली. युवा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी एकात्मतेचा संदेश उमटला. ढोल-ताशे, भगवे पताके आणि उमेदवारांच्या स्वागत करण्यात आले. महिलांनी आरती करून तर व्यावसायिकांनी पुष्पवृष्टी करत समर्थन व्यत केले.
 
 
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी देवळी शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी भाजपा तयार आहे. आजचा उत्साह म्हणजे देवळीतील नागरिकांचा भाजपावरचा विश्वास असल्याचे गाते यांनी सांगितले. देवळीकरांच्या आशीर्वादाने, विकासाच्या निश्चयी संकल्पासह भाजपाची विजयी पताका नकीच फडकणार,‡असा विश्वास माजी खासदार रामदास तडस यांनी व्यत केला.
Powered By Sangraha 9.0