काँग्रेसच्या कुमुद सोनुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

16 Nov 2025 19:32:46
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
kumud-sonule : हदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नगर परिषद अध्यक्ष पदासाठी मोठ्या उत्साहात व शक्ती प्रदर्शनाच्या पृष्ठभूमीवर कुमुद सुनील सोनुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार माधव जवळगावकर, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर केले.
 
 
 
y16Nov-Kumud-Sonule
 
 
 
शहरात ‘हदगावकर मॅडम’ म्हणून परिचित असलेल्या कुमुद सोनुले या अनुभवी व लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात. शासन अनुदानित पतसंस्थेच्या चेअरमन पदावर काम करताना त्यांनी चार वर्षे उल्लेखनीय कारकीर्द बजावली आहे. त्यांची कौटुंबिक राजकीय परंपरा देखील भक्कम आहे. त्यांचे सासरे दिवंगत हरिहर सोनुले हे नांदेड जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून प्रसिद्ध होते. तर सासू अंजना सोनुले यांनी हदगाव नगर परिषदेच्या पहिल्या महिला नप अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला. पती सुनील सोनुले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य असून हदगाव नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अधिकृत पक्षाकडून अध्यक्ष पदाकरिता हा पहिलाच अर्ज असून यापूर्वी नगरपरिषदेसाठी अपक्षाचा अर्ज दाखल करण्यात आला. अपक्ष म्हणून चार जणांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेस पक्षाकडूनच प्रभाग क्रमांक दोन मधून सुलताना खदीर खान यांनी देखील नामांकन दाखल केला.
Powered By Sangraha 9.0