कानशिलात मारल्याच्या रागातून पत्नीचा खून

16 Nov 2025 20:46:26
अनिल कांबळे
नागपूर, 
man-kills-wife : पत्नीला वारंवार समजून सांगितल्यानंतरही ती कुणाशीतरी  फोनवर बाेलत असल्याने रागाच्या भरात पतीने तिची मारहाण केली. मात्र, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. आराेपी पतीला मानकापूर पाेलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. सुनील नारायण यदुवंशी (26) असे पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीचे नाव आहे.
 
 
 
kills
 
 
 
सुनील यदुवंशी याचे दाेन वर्षांपूर्वीच राणी (22) या तरुणीशी विवाह झाला हाेता. ताे पत्नीसह मानकापूर पिसरातील दावत लाॅनच्या शेजारी राहत हाेता. सुनील हा केटरिंगचा व्यवसाय करतााे आणि रिकाम्या वेळात टॅक्सी चालवताे. पत्नी ही कुण्यातरी युवकाशी ाेनवरुन नेहमी बाेलत हाेती. ही बाब पतीला खटकत हाेती. त्यामुळे ताे तिला फोनवर बाेलण्यासाठी मनाई करीत हाेता. मात्र, पत्नी ऐकायला तयार नव्हती. त्यावरुन दाेघांत वाद हाेत हाेते. त्या युवकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय सुनीलला हाेता. राणी मध्यरात्रीनंतर चाेरून ाेनवरुन बाेलत असल्याचे सुनीलच्या लक्षात आले.
 
 
त्यामुळे राणीच्या चारित्र्यावर संशय हाेता. 14 नाेव्हेंबरला रात्रीच्या दाेनच्या सुमारास टॅक्सी घेऊन घरी आलेल्या सुनीलला राणी ाेनवर बाेलताना दिसली. त्याने विचारणा केली असता ती सांगायला तयार नव्हती. त्यामुळे त्याने माेबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. ती माेबाईल हात लावू देत नव्हती. त्यामुळे संशयावरून दाेघांत भांडण झाले. या संतापासून सुनीलने राणीला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या राणीनेही पतीच्या कानशिलात लगावली. पत्नीने मारल्यामुळे चिडलेल्या सुनीलने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी मानकापूर पाेलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली.
 
 
बेशुद्ध पडल्याचा बनाव
 
 
कामावरुन घरी आलाे असता पत्नी बेशुद्धावस्थेत पडलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातात हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचा अहवाल डाॅक्टरांनी दिल्यानंतर पाेलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी आराेपी पतीला अटक केली असून त्याने हत्याकांडाचा कबुली दिली.
Powered By Sangraha 9.0