आर्वी,
bala-sonatake : स्वतःच्या गावावर नितांत प्रेम करून गावाच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे मिर्झापूर नेरी येथील सरपंच बाळा सोनटके हे सोमवार १७ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ग्रामविकासावर संवाद साधणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांचे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाल्याची माहिती ग्रापं अधिकारी संजय यावले यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या सरपंच संवाद कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातून ४ सरपंच या कार्यक्रमात सहभागी होत असून सरपंच संवाद टीम, भारतीय गुणवत्ता परिषदेच्या माध्यमातून संपन्न होणार्या या सरपंच संवाद कार्यक्रमात मिर्झापूर नेरीचे सरपंच बाळा सोनटके सरपंचाशी ग्राम विकासाच्या बाबतीत चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम विभागीय कार्यालय नागपूर येथे १७ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणारे बाळा सोनटके हे विदर्भातून एकमेव सरपंच आहेत.