नागपूर,
MP Cultural Festival नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रचंड गर्दी उसळली. सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी युवक, महिला आणि विविध वयोगटातील नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने अनेकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले पासेस उपलब्ध झाले नाहीत.
पास न मिळाल्याने काही युवक व प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमस्थळाबाहेर झालेल्या मोठ्या रांगा, वाढलेली गर्दी आणि किरकोळ गोंधळामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. MP Cultural Festival आयोजकांनी अतिरिक्त पास उपलब्ध करून द्यावेत तसेच गर्दी नियंत्रणासाठी अधिक चांगली व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, महोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र