थंडीची लाट...नागपूरचा पारा १०.८ अंशावर

16 Nov 2025 20:49:16
नागपूर,
cold-wave-nagpur : उत्तरेकडून वाहणार्‍या अतिथंड वार्‍यामुळे नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. हिवाळा जेमतेम सुरू होत असताना नागपूर शहरात आता थंडीची लाट सदृश्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. दोनच दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशाने खाली घसरले असल्याने रात्री हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे. हवामान विभागाने रविवारी नोंदविलेला पारा हा १०.८ अंश असून गोंदिया अंश असल्याने विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले आहे.
 
 

mgp 
 
 
 
गुलाबी थंडीचे आगमन झाले असले तरी नागपूरसह राज्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने गारठा जाणवू लागला आहे. गत महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे यंदा थंडी अनुभवायला मिळणार की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला होता.
 
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्याची देणारी गुलाबी थंडी दाखल झाली असून, अनेक शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नागपूर शहरात आता सकाळी धुक्याची चादर पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0