पुलगाव नपसाठी बंडखोरीची वाढण्याची शयता

16 Nov 2025 19:50:10
पुलगाव,
pulgaon-municipal-council : पुलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जेव्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ऑनलाईन व्यतिरित ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात येतील असे पत्र प्रसिद्ध केले तेव्हापासुन नगरपालिका परिसरात अर्ज भरणार्‍यांचा मेळाच भरल्याचे दृश्य होते. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत विविध पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज तपासणी करण्यात गुंग होते. भारतीय जनता पक्षाकडून या वेळी अनेक निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कळते.
 
 
 
pulgao
 
 
 
काँग्रेसमध्ये तिकीटवाटपाबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अधिकृत तिकीट कोणालाही मिळाले नाही. परंतु अनेकांनी तिकीट मिळेल या अपेक्षेने नगरपालिका कार्यालयात अर्ज दाखल केले. बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते उमेश म्हैसकर यांच्या नेतृत्वात वाजतगाजत नामांकन दाखल करण्यासाठी मोठ्या जल्लोषात पोहोचले.
Powered By Sangraha 9.0